Wednesday, July 8, 2009

स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतंय? काळजी करू नका...

सविता, वय वर्षे ४२, सध्या तिला सतत काहीतरी विचित्रच घडतंय असं वाटतंय, बोलताना शब्द आठवत नाहीत, ठरवलेल्या गोष्टी लक्षात राहत नाहीत, कधीकधी तर अगदीच "ब्लॅंक' झाल्यासारखं वाटतं, स्मृतिभ्रंश झाल्यासारखं वाटतंय. कशामुळे हे बदल होत आहेत?

वरील सर्व तक्रारी या ४२ ते ५४ या वयोगटातील स्त्रियांना कमी जास्त प्रमाणात जाणवत राहतात. यामागील कारण शोधण्यासाठी लॉस एंजल्स येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉ. गेल ग्रीनडेल यांनी ४२ ते ५४ वयोगटांतील स्त्रियांची बुद्धिमत्ता चाचणी घेतली. या चाचणीत त्यांची बौद्धिक क्षमता, तत्काळ निर्णय घेण्याची क्षमता, परिस्थितीचे भान इ. विषयांची परीक्षा घेतली गेली.

त्यातून त्यांनी निष्कर्ष काढला, की ऋतुनिवृत्ती येण्याच्या काळात काही मर्यादित कालावधीसाठी आकलनक्षमता कमी होते. काही स्त्रियांमध्ये सुरवातीच्या काळात तर काहींमध्ये त्यादरम्यान हे बदल घडू लागतात. स्मृतिभ्रंशाचे प्रमाण प्रत्येक स्त्रियांमध्ये वेगवेगळे आढळून आले; पण अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऋतुनिवृत्तीचा काळ संपल्यानंतर मात्र बौद्धिक क्षमता पूर्ववत झालेली आढळून आली. त्यामुळे या वयोगटातील स्त्रियांना आपल्याला स्मृतिभ्रंश होतोय की काय, असं वाटत असेल तर ते तत्कालीक आहे आणि काही दिवसांनी सर्व काही सुरळीत होईल असं समजण्यास हरकत नाही.

सौजन्य :ई-सकाळ

Saturday, July 4, 2009

What is Ayurveda? - Simple Definition



Ayurveda is a wholistic system of medicine from India that uses a constitutional model. Its aim is to provide guidance regarding food and lifestyle so that healthy people can stay healthy and folks with health challenges can improve their health. There are several aspects to Ayurveda that are quite unique:

Its recommendations will often be different for each person regarding which foods and which lifestyle they should follow in order to be completely healthy. This is due to it's use of a constitutional model.

Everything in Ayurveda is validated by observation, inquiry, direct examination and knowledge derived from the ancient texts. It understands that there are energetic forces that influence nature and human beings. These forces are called the Tridoshas. Because Ayurveda sees a strong connection between the mind and the body, a huge amount of information is available regarding this relationship.

Ayurveda is an intricate system of healing that originated in India thousands of years ago. We can find historical evidence of Ayurveda in the ancient books of wisdom known as the Vedas. In the Rig Veda, over 60 preparatison were mentioned that could be used to assist an individual in overcoming various ailments. The Rig Veda was written over 6,000 years ago, but really Ayurveda has been around even longer than that. What we see is that A yurveda is more than just a medical system

Aloe Vera: The Ayurvedic Miracle Plant



Aloe vera has been one of the most important plants used in folk medicine. The Egyptians referred to aloe as the "plant of immortality" and included it among the funerary gifts buried with the pharaohs. The healing benefits of aloe were recognized in the ancient Indian, Chinese, Greek, and Roman civilizations. It is traditionally used to heal wounds, relieve itching and swelling, and is known for its anti-inflammatory and antibacterial properties.

Aloe Vera, or Ghrit Kumari in Sanskrit, is a member of the lily family and is very cactus-like in its characteristics. It is one to two feet tall; and its leaves are succulent, broad at the base and pointed at the tips, with spines along the edges. These fat leaves contain the clear healing gel that is 96% water. The other four percent contains 75 known substances including Vitamins A, B, C, E, calcium, amino acids for protein building, and enzymes used in the digestive system.

There are over 240 species of aloe, however only 3 or 4 of them have medicinal properties; the most potent one is Aloe Vera Barbadenis. Native to North Africa and Spain, this plant now also grows in the hot dry regions of Asia, Europe and America.

External Applications

The healing effect of aloe results from its ability to prevent injury to epithelial tissues, and promote healing of injured tissues. An epithelium is a layer of cells that covers the body. Our largest epithelium is the skin and one of the main applications of aloe vera is to soothe a variety of skin ailments such as mild cuts, insect stings, bruises, poison ivy and eczema. It also has antibacterial and antifungal qualities, and increases blood flow to wounded areas. In addition, aloe vera stimulates fibroblasts, the skin cells responsible for wound healing and the manufacture of collagen, the protein that controls the aging process of the skin and wrinkling. The skin absorbs aloe vera up to four times faster than water; it appears to help the pores of the skin open and receive the moisture and nutrients of the plant.

Due to its soothing and cooling qualities, Ayurveda recommends aloe vera for a number of skin conditions --

  • Light burns and wounds: Cut off an aloe leaf and apply the gel several times a day.(It is advisable to consult a health professional in the event of any injury)

Internal Applications

In addition to the skin, other epitheliums in our body include the lining of the gut, the bronchial tubes and the genital tract, which also benefit from the healing effect of aloe vera. When taken internally, aloe vera juice aids the digestion and absorption of nutrients, helps control blood sugar, increases energy production, promotes cardiovascular health, improves liver function, and boosts the immune system.

  • For balancing digestion and elimination: Take 1 tablespoon aloe vera gel in the morning on an empty stomach. Aloe helps clear the toxins out of the digestive system, facilitates digestion and improves the functioning of the kidneys, liver and gall bladder. The anti-inflammatory fatty acids in aloe alkalize the digestive juices and prevent acidity-a common cause of indigestion. These fatty acids benefit not only the stomach but the small intestine and the colon as well.
  • Skin problems: Since aloe vera purifies the body and aids liver function, it is beneficial for the skin when taken internally. Take 1-2 teaspoons fresh aloe gel daily for young and healthy skin.

Note: Pregnant women and children under five should not take aloe vera internally.


Friday, July 3, 2009

Ayurved:अन्नयोग

रोजच्या आहारात असाव्यात अशा बऱ्याचशा फळभाज्यांचे गुणधर्म आपण पाहिले. आज आपण प्रकृती व दोषांचा विचार करून मग सेवन कराव्या अशा काही भाज्यांची माहिती पाहणार आहोत.

वांगे

वृन्ताकं स्वादु तीक्ष्णोष्णं पाके कटु च दीपनम्‌ ।

अपित्तलं लघु क्षारं शुक्रलं ज्वरनाशनम्‌ ।।

...निघण्टु रत्नाकर

वांगे चवीला गोड, स्वादिष्ट असले तरी गुणाने तीक्ष्ण असते, वीर्याने उष्ण असते, तसेच विपाकाने तिखट असते. पचायला हलके असले तरी क्षारयुक्‍त असते. थोड्या प्रमाणात खाल्ले तर पित्तकर नसते, शुक्रप्रवर्तक असते.

वांगे तीक्ष्ण, उष्ण व विपाकाने तिखट असल्याने रक्‍तदोष वा त्वचाविकार असणाऱ्यांसाठी अपथ्यकर असते, असा वृद्धवैद्याधार आहे.

ढोबळी मिरची

नावाप्रमाणे मोठी असणारी ही भाजी मिरचीचाच एक प्रकार आहे. चवीला तिखट, कडवट असणारी ही भाजी पित्त-वातकर असते. शरीरात रुक्षता वाढविणारी असते. त्यामुळे वाताचा त्रास असणाऱ्यांनी, आम्लपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी शक्‍यतो ही भाजी खाणे टाळणे उत्तम. त्वचाविकार असणाऱ्यांनी किंवा अंगावर पित्त उठण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनीही ढोबळी मिरची नियमितपणे खाऊ नये.

गवार

बाकुचीशिम्बिका रुक्षा वातला मधुरा गुरुः ।

सरा कफकारी चाग्निदीपनी पित्तनाशिनी ।।

... निघण्टु रत्नाकर

गवारीच्या शेंगा गुणाने रुक्ष, तसेच पचायला जड असतात. चवीला गोड असल्या तरी वातदोष वाढवणाऱ्या असतात. सारक असतात. कफ वाढवितात. कोवळ्या असताना योग्य प्रमाणात खाल्ल्या असता अग्निदीपन करतात व पित्तदोष कमी करतात.

गवारीच्या शेंगा जून झाल्या असता अधिकाधिक कोरडेपणा वाढवणाऱ्या होतात. त्वचारोगात, वातरोगात, मूत्रमार्गात जंतुसंसर्ग होण्याची प्रवृत्ती असताना गवार खाणे टाळणे चांगले.

घेवडा / फरस बी

ग्रामजा वातला रुच्या तुवरा मधुरा मता ।

मुखप्रिया कण्ठशुद्धिकारिणी ग्राहिणी मता ।।

... निघण्टु रत्नाकर

घेवडा वात वाढवतो. चवीला गोड-तुरट असून, रुचकर असतो. घेवड्याच्या कोवळ्या शेंगा कंठशुद्धी करण्यास मदत करतात. मलप्रवृत्ती बांधून ठेवण्यास मदत करतात. मात्र जून शेंगांमुळे पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.

वाताचा त्रास असणाऱ्यांनी घेवडा काळजीपूर्वक खावा.

कोबी - फ्लॉवर

या भाज्यांचा ग्रंथात पक्का उल्लेख सापडत नाही, पण या भाज्यांच्या सेवनामुळे पोटात वायू धरतो, असा अनेकांचा अनुभव असतो. मूत्रासंबंधी काहीही तक्रार असताना या भाज्या अपथ्यकर ठरतात. आकार मोठा व्हावा म्हणून वापरली जाणारी खते, पानांना कीड लागू नये म्हणून वरून फवारली जाणारी रासायनिक द्रव्ये यांचा परिणाम या भाज्या धुतल्या, शिजवल्या तरी जाऊ शकत नाही. शिवाय या प्रकारच्या अनैसर्गिक प्रक्रियेतून तयार झालेले कोबी, फ्लॉवर निःसत्त्वही असतात. म्हणून सहसा बाजारात मिळणारे मोठ्या आकाराचे व सहज कीड लागू शकणारे कोबी- फ्लॉवर अपथ्यकर समजावे लागतात.

भूमिछत्र - मश्रूम

आजकाल मश्रूम खूप प्रचलित झाल्याचे दिसते. आयुर्वेदाच्या ग्रंथात मश्रूमला "भूमिछत्र' म्हटलेले आहे.

सर्वे संस्वेदजाः शीता दोषलाः पिच्छिलाश्‍च ते ।

गुरवश्‍छर्द्यतीसार- ज्वरश्‍लेष्मामयप्रदाः ।।

... भावप्रकाश

सर्व प्रकारचे मश्रूम दोषवर्धक, बुळबुळीत, चिकट असतात. ते पचायला जड असून त्यामुळे उलटी, जुलाब, ताप किंवा इतर कफविकार उत्पन्न होऊ शकतात. त्यातल्या त्यात स्वच्छ ठिकाणी उगवलेले मश्रूम थोडे कमी दोषकारक असतात. जमिनीवर, लाकडावर, झाडावर, तसेच गोमयाच्या ढिगावर मश्रूम उगवतात, असाही उल्लेख भावप्रकाशात आहे. काही मश्रूम विषारीही असतात. खाण्यास योग्य मश्रूम पारखून घेणे आवश्‍यक असते. कारण मश्रूममध्येही चिकटपणा, जाडपणा वेगवेगळा असतो.

एकंदरच मश्रूममुळे ताकद मिळत असली तरी ते एक प्रकारचे जडान्न असल्याने अपथ्यकरच समजले जातात.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या शेंगांची भाजी करण्याची पद्धत नसली तरी आमटीत, पिठल्यात शेवग्याच्या शेंगा टाकणे पथ्यकर असते.

शिम्बी चास्याग्निदीपनी ।

तुवरा स्वादु मधुरा कफपित्तज्वरक्षयान्‌ ।

कुष्ठशूलश्‍वासगुल्मनाशिनी च प्रकीर्तितः ।।

... निघण्टु रत्नाकर

शेवग्याच्या शेंगांमुळे अग्नीचे दीपन होते. चवीला स्वादिष्ट असणाऱ्या या शेंगांमुळे कफ-पित्तदोषाचे शमन होते. क्षयरोग, ताप, त्वचारोग, शूल, दमा, गुल्म वगैरे व्याधींमध्ये शेवग्याच्या शेंगा हितकर असतात.

एकंदर वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्यांनी, जंत होण्याची प्रवृत्ती असणाऱ्यांनी शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे चांगले असते.

शेवग्याच्या फुलांचीसुद्धा भाजी केली जाते. ती डोळ्यांसाठी विशेष उपयुक्त असते.



अन्नयोग - कंद

आपल्या आहारात कंद हवा. मग ते गाजर असो वा सुरण; बटाटा असो वा रताळे. मात्र आपल्या आहारातील कंदाचे पथ्यापथ्य समजून घेऊन त्याची निवड करा.

आपण आत्तापर्यंत फळभाज्या तसेच पालेभाज्यांची माहिती घेतली. आज आपण कंद स्वरूपात तयार होणाऱ्या भाज्यांची माहिती घेणार आहोत.

सुरण

उपवासासाठी चालणाऱ्या काही मोजक्‍या भाज्यांमध्ये सुरणाचा अंतर्भाव होतो. सुरणाचे कंद खूप मोठे असू शकतात.

सुरणो दीपनो रुक्षः कषायः कण्डुकृत्‌ कटुः ।

विष्टम्भी विशदो रुच्यः कफार्शः कृन्तनो लघु ।

विशेषात्‌ अर्शने पथ्यः प्लीहगुल्मविनाशनः ।।


...भावप्रकाश

सुरण चवीला तुरट असतो, विपाकाने तिखट असतो. इतर सर्व कंदमुळांपेक्षा पचायला सोपा असतो. सुरण अग्निदीपन करतो, रुक्षता वाढवतो, तसेच अवष्टंभकर असतो. कफज मूळव्याधीत विशेष पथ्यकर असतो. प्लीहा वाढणे, गुल्म तयार होणे वगैरे व्याधींत हितकर असतो.

सुरणामध्ये खाज निर्माण करण्याचा दुर्गुण असतो. तो घालविण्यासाठी सुरणाचे तुकडे चिंचेच्या पाण्याने धुतले जातात किंवा चिंचेच्या पाण्यासह उकळायचे असतात.

सुरण वाफवून तयार केलेली भाजी मूळव्याधीमध्ये, विशेषतः कंड सुटणाऱ्या मूळव्याधीमध्ये हितकर असते. मात्र त्वचारोगात तसेच रक्‍तपित्तामध्ये सुरण अपथ्यकर समजले जाते.

बटाटा

काहींच्या मते बटाटा ३००-४०० वर्षांपूर्वी भारतात आला. आयुर्वेदात पिण्डालुक, आलुक, रक्‍तालु वगैरे अनेक प्रकारचे कंद वर्णन केलेले आहेत, तसेच आलुकाचे सामान्य गुणही वर्णन केलेले आहेत. हे बटाट्याला चपखल बसणारे आहेत.

आलुकं शीतलं सर्वं विष्टम्भी मधुरं गुरु ।

सृष्टमूत्रमलं रुक्षं दुर्जरं रक्‍तपित्तनुत्‌ ।

कफानिलकरं बल्यं वृष्यं स्वल्पाग्निवर्द्धनम्‌ ।।


...भावप्रकाश

सर्व प्रकारचे आलुक म्हणजे बटाटे वीर्याने थंड असतात, चवीला गोड असतात, पचायला जड असतात, मल-मूत्र होण्यास सहायक असतात, कफकर तसेच वातकर असतात. रक्‍तदोष, पित्तदोषात हितकर असतात, ताकद वाढवतात, शुक्रधातू वाढवतात व काही प्रमाणात अग्निसंदीपन करतात.

या ठिकाणी बटाटा वातकर सांगितला असला तरी तो उकडून मिरी, जिरे, आले वगैरेंसह खाल्ला तर वात वाढताना दिसत नाही. तळलेल्या बटाट्यामुळे मात्र वात वाढू शकतो. अग्नी मंद असताना बटाटा खाल्ला, तर पचनसंस्थेत थोडा वात वाढताना दिसला तरी बटाट्यामुळे चवळी, वाटाणा, चण्याप्रमाणे वात वाढत नाही, असा अनुभव आहे.

रताळे

आयुर्वेदात रक्‍तालु नावाने ओळखले जाणारे रताळेही उपवासासाठी चालते.

आलुकी बलकृत्स्निग्धा गुर्वी हृत्कम्पनाशिनी ।

विष्टम्भकारिणी तैले तलिता।तिरुचिप्रदा ।।


...भावप्रकाश

रताळे स्निग्ध असते, ताकद वाढवते, पचायला जड असते, हृदयाची धडधड कमी करते, मलावष्टंभ करू शकते व तळून खाल्ले असता खूप रुचकर लागते.

रताळे उकडून खाणे चांगले असते; मात्र भूक न लागणाऱ्या व्यक्‍तींनी रताळे विचारपूर्वक खावे. प्रमेह, मधुमेह, स्थूल व्यक्‍तींनीही रताळे शक्‍यतो टाळावे.

गाजर

गृज्जनं मधुरं तीक्ष्णं तिक्‍तोष्णं दीपनं लघु ।

संग्राहि पक्‍तपित्तार्शो ग्रहणीकफवातजित्‌ ।।


...भावप्रकाश

गाजर चवीला गोड असले तरी गुणाने उष्ण-तीक्ष्ण असते, अग्नी प्रदीप्त करते, पचायला हलके असते, मलप्रवृत्ती बांधून होण्यास मदत करते. गाजर पित्तज मूळव्याध, संग्रहणीमध्ये पथ्यकर असते, तसेच कफदोष व वातदोषात हितकर असते.

गाजराचा कोशिंबीर म्हणून वापर करणे चांगले असते. त्यातही ते शिजवून खाणे अधिक चांगले असते. मात्र आजकाल रूढ होत असलेली गाजराचा रस पिण्याची पद्धत चांगली नाही. कारण त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते, त्वचारोग बळावतात, मलावष्टंभ होऊ शकतो.

डॉ. श्री बालाजी तांबे

Ayurved:उपवासातून आरोग्य

प्रकृतीला अहितकारक होईल इतका कडक उपवास धरणे किंवा उपवासाच्या नावाने रोजच्यापेक्षा दुप्पट खाणे, या दोन्ही गोष्टी अनारोग्याच्या ठरतात. आरोग्य मिळवायचे असेल तर आपल्या प्रकृतीला मानवेल अशा स्वरूपाचाच उपवास करावा.

उपवास, व्रतवैकल्ये वगैरे गोष्टी धार्मिक, आध्यात्मिक समजल्या जातात; पण उपवास हा एक उपचार प्रकार आहे, असे आयुर्वेदात सांगितले आहे. उपवास हा लंघनाचा एक प्रकार असतो.

लघुभोजनं उपवासो वा लंघनम्‌।।

...चरक चिकित्सास्थान

(हलका आहार किंवा उपवास म्हणजे काही न खाणे हे लंघन होय.)

आयुर्वेदात लंघनाची व्याप्ती बरीच मोठी आहे. उपवास हा लंघनाचा एक भाग झाला; पण शरीरशुद्धी, व्यायाम, सूर्यस्नान, वायुसेवन, पाचन हे सुद्धा लंघनाचेच प्रकार होत. म्हणूनच लंघनाचे जे काही फायदे आहेत ते योग्य प्रकारे केलेल्या उपवासाने मिळू शकतात.

"लाघवकरं कर्मं लंघनम्‌' म्हणजे हलकेपणा आणणारे ते लंघन अशी लंघनाची व्याख्या असल्याने उपवास केल्यास शरीर हलके होणे अपेक्षित आहे हे समजते. उपवासातून आरोग्य हवे असेल, तर हा उपवास आयुर्वेदातील लंघन संकल्पनेला धरून असायला हवा.

लघुभोजनं उपवासो वा।।

...चरक विमानस्थान

हलके भोजन किंवा उपवास म्हणजे काही न खाणे, या दोन गोष्टी एकमेकांना पर्याय आहेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे. म्हणजेच उपवासातून आरोग्य मिळवायचे असणाऱ्याने आपल्या प्रकृतीनुसार उपवासाचे स्वरूप ठरवणे अपेक्षित आहे.



महाभूतांचे संतुलन

उपवासामुळे किंवा लंघनामुळे शरीरात आकाश, वायू व अग्नी महाभूतांचे संतुलन होते व यातून पुढील गोष्टी साध्य होतात -

शरीराचे जडत्व दूर होते.

अतिरिक्‍त कफदोष कमी होतो.

प्रमाणापेक्षा वाढलेल्या दोषाचे पचन होते.

अग्नी प्रदीप्त होतो.

आयुर्वेदात "आमदोष' अशी एक संकल्पना मांडली आहे. जठराग्नीची ताकद कमी पडल्यामुळे अन्नाचे पचन योग्य प्रकारे होऊ शकले नाही, की त्यापासून जो अर्धवट कच्चा रस तयार होतो तोच आमदोष होय. हा आम मुख्यत्वे आमाशयाच्या आश्रयाने राहतो; पण जर त्याचे वेळेवर पचन केले नाही, तर तो सर्व शरीरात पसरून अनेक प्रकारचे विकार उत्पन्न करतो. आमदोषाचे रोगकारित्व इतके जबरदस्त असते, की "आमय' हा रोगाला पर्यायी शब्द म्हणून वापरला जातो, तर जेथे आम नाही ती निरामय, निरोगी अवस्था समजली जाते. शरीरात आमदोष तयार झाला, की मलमूत्राचा अवरोध तयार होतो, ताकद कमी होते, शरीराला जडपणा येतो, आळस प्रतीत होतो, तोंडाची चव नष्ट होते, मळमळते, पोटात दुखते, चक्कर येते, अधोवायूला- शौचाला दुर्गंधी येते, आंबट ढेकर येतात.

अशा प्रकारे अनेक प्रकारची त्रासदायक लक्षणे निर्माण करणारा आमदोष वाढला असता, काहीही न खाता उपवास करणे अपेक्षित असते. यामुळे आम पचायला मदत मिळते. विशेषतः आमामुळे ताप आला असता किंवा आमामुळे अजीर्ण झाले असता काहीही न खाता उपवास करणे उत्तम असते.

अर्थात, आमदोष वाढून त्रास होण्यापर्यंत थांबण्याची आवश्‍यकता असते असे नाही. आठवड्यातून एकदा संध्याकाळचे जेवण न घेण्याची सवय लावून घेतली, तर त्यामुळे आमदोष तयार होण्यास प्रतिबंध करता येऊ शकतो. अग्निसंस्कार केलेले म्हणजे उकळलेले पाणी पिणे हेही आमदोष तयार न होण्यासाठी उत्तम असते.

प्रकृतीला हितावह उपवास

काही न खाता उपवास हा आमदोष पचविण्यासाठी उपयुक्‍त असला, तरी सरसकट सगळ्या प्रकृतीसाठी असा कडक उपवास हितावह ठरेलच असे नाही. विशेषतः दिवसभर किंवा अनेक दिवस फक्‍त फळे खाणे, नुसते दूध पिणे किंवा नुसते पाणीच पिणे अशा प्रकारचा उपवास सर्वांना मानवणारा नसतो. विशेषतः पित्त वा वातप्रधान प्रकृतीमध्ये पचण्यास हलके अन्न खाऊन उपवास करणेच अधिक योग्य असते.

योग्य पद्धतीने उपवास करण्याने लाभणारे काही फायदे आयुर्वेदात सांगितले आहेत -

विमलेंद्रियता, मलानां प्रवृत्तिः, गात्रलघुता, रुचिः, क्षुत्तृषोरेककालमुदयः, हृदयोद्गारकण्ठानां शुद्धिः, रोगामार्दवमुत्साहः तन्द्रानाशश्‍च।

सर्व इंद्रिये शुद्ध होतात.

मल-मूत्र-स्वेद आदी मलांचे प्रवर्तन यथायोग्य होते.

शरीरावयवात हलकेपणा प्रतीत होतो.
तोंडाला रुची येते.

तहान व भूक हे एकाच वेळी अनुभूत होतात.

शुद्ध ढेकर येतात.

घसा मोकळा वाटतो.

हृदयात हलकेपणा प्रतीत होतो.
रोग असल्यास रोगाचा जोर कमी होतो.

उत्साह उत्पन्न होतो.

झापड नाहीशी होते.

साळीच्या लाह्या, मुगाची डाळ, भाजलेले तांदूळ, ज्वारी-बाजरीची भाकरी, दुधी भोपळा, घोसावळी, दोडके, पडवळ, कारले वगैरेंपैकी साधी भाजी, ताक या गोष्टींचा हलक्‍या अन्नात समावेश होतो.

"एकादशी, दुप्पट खाशी' नको

उपवासाच्या गोष्टी खाऊन उपवास करायचा असल्यास राजगिऱ्याच्या लाह्या, वरईचा तांदूळ, शिंगाडा, दूध, प्रकृतिनुरूप फळे, थोड्या प्रमाणात साबूदाण्याची खिचडी, थोड्या प्रमाणात उकडलेला बटाटा वगैरे पदार्थ खाता येतात; पण उद्या उपवास करायचा आहे या कारणास्तव आज अधिक खाऊन घेणे योग्य नव्हे; तसेच उपवासाचे पदार्थ चवीला आवडले म्हणून अगदी पोटभर खाणे, पोट जड होईपर्यंत खाणे अयोग्य होय. या प्रकारच्या उपवासातून अनारोग्यास आमंत्रणच मिळू शकते.

एखादी गोष्ट कितीही उत्कृष्ट असली, तरी ती कुणी व कधी करू नये हे माहिती असणे सर्वांत आवश्‍यक असते. उपवास करण्याचे खूप फायदे असले, तरी तो पुढील अवस्थेत न करणे अधिक आरोग्यदायक असते.

क्षयरोग झाला असता.

वातरोग झाला असता.

वातामुळे ताप आला असता.

काम-क्रोध वगैरे मानसिक कारणांमुळे ताप आला असता.

गर्भावस्था असताना.

बाळंतपणाची परिचर्या सांभाळत असताना.

आजारपणात किंवा आजारपणानंतर ताकद कमी झाली असता.

पंचकर्मासारखा शरीरशुद्धीकर उपचार चालू असता.

व्यवहारात बऱ्याच वेळा प्रकृतीला सोसवत नसतानाही मोठमोठे उपवास करण्याचा अट्टहास अनेकांनी धरलेला दिसतो; पण अनारोग्य वाढविणारी कोणतीच गोष्ट सरतेशेवटी स्वहिताची असू शकत नाही. सहन होत नसतानाही नियम म्हणून वर्षानुवर्षे उपवास करत राहणे आणि पोटाला-पचनाला जराही विश्रांती न देता सतत खात राहणे ही दोन्ही टोके टाळून प्रकृतिनुरूप उपवास करण्याचा सुवर्णमध्य साधला तर उपवासातून आरोग्य निश्‍चित मिळू शकेल.
डॉ. श्री बालाजी तांबे

Wednesday, July 1, 2009

आयुर्वेद::मुलांमधील बंडखोरवृत्ती

बुद्धीने चांगल्या असलेल्या, हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा बंडखोर प्रवृत्ती दिसून येते. ती त्या मुलांचे नुकसानच करीत असते. त्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांची माहिती.

मुलांमधील अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (Oppositional Defiant Disorder)

""डॉक्‍टर, खरं तर मी अमोलसाठी तुमच्याकडे आले आहे. अमोल माझा तेरा वर्षांचा मुलगा. अतिशय हुशार, पण बंडखोर प्रवृत्तीचा. प्रत्येक गोष्टीत वाद घालतो, विरोधाला विरोध करतो. एकही संवाद त्याच्याशी धड करता येत नाही. आमच्या साध्या बोलण्याचं रूपांतरही दरवेळी वादातच होतं. आताही तुमच्याकडे यायला स्पष्ट नकार दिला, म्हणाला, ""मला नाही, तुम्हा पालकांनाच ट्रिटमेंटची गरज आहे.''

काही वेळा मुलांमधली नकारात्मकता मानसिक समस्येचं रूप धारण करते. या समस्येला अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (ODD) असं म्हणतात. अशी बंडखोर प्रवृत्तीची असणारी मुलं त्यांच्या वयाला अपेक्षेपेक्षा जास्त नकारात्मक, आक्रमक, विरोधी आणि आवेशपूर्ण वागतात. या मुलांमध्ये दिसणारी लक्षणं-

खूप वेळा हट्ट व अडमुठेपणाने वागणं.

सतत मोठ्यांशी वाद घालणं.

मुद्दाम अवज्ञा करणं, नियम मोडणं.

मुद्दाम इतरांना राग येईल, चिडचिड होईल वा भांडणाला सुरवात होईल या तऱ्हेने वागणं.

क्षुल्लक कारणांवरून खूप राग येणं, त्यावरून इतरांना उद्धटपणे बोलणं.

स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं.

सूड घेण्याची वृत्ती.

साधारण पाच ते पंधरा टक्के शाळेतल्या वयाच्या मुलांमध्ये ही समस्या आढळते. या समस्येची ठोस कारणं जरी माहिती नसली तरी मुलाचा मूळचा अडमुठा स्वभाव, पालकत्वाच्या सदोष पद्धती, घरचं वातावरण, अशा अनेक गोष्टी याकरता जबाबदार असतात असं अभ्यासक मानतात. कधी कधी या समस्येबरोबरच मुलांमध्ये, अतिचंचलता, अध्ययन अक्षमता, भावनिक अस्थिरता अशा इतर समस्याही आढळतात.

अशा मुलांना हाताळणं, त्यांच्यावर संस्कार करणं, हे पालकांसाठी मोठंच आव्हान असतं. कारण यांच्या सतत नकारात्मक वागण्याने घरात वारंवार वाद, भांडण होतात, यांच्या विरोधाने चिडून पालक खूप कडक शिस्त लावणं, शिक्षा करणं अशी उपाययोजना करतात; पण त्यामुळे समस्या कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्‍यता जास्त असते. अशा मुलांशी वागताना पालकांनी काही तत्त्व खास करून लक्षात ठेवावी.

या मुलाला सतत हुकूमशाही पद्धतीने "नाही', "नको' म्हणून दडपणं टाळावं.

त्यांना एक व्यक्ती म्हणून आदराने वागवावं.

धमक्‍या, शिक्षा, विशेषतः मारणं किंवा शारीरिक कुठल्याच मुलांसाठी योग्य नाहीत.

पालकत्वामध्ये सातत्य, एकवाक्‍यता आणि ठामपणा हवा. शिस्त लावताना, नियम घालताना मुलांना सामावून घ्या. त्यांना त्यांचा राग योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवा.

अशा मुलांना आणि पालकांना जशी समुपदेशनाची खूप मदत होते, तशीच या मुलांना होमिओपॅथिक उपचारांचाही खूप फायदा होतो. अर्थातच तज्ञ व्यक्तिशिवाय यापैकी काही औषधे -

1) ऍनाकारडियम - मानसिक आंदोलने खूप विरोधी प्रकारची असतात. कधी खूप चांगली कधी खूप विचित्र वागतात. स्वभावात खूप क्रूरता, तिरस्कार दिसून येतो.

2) लायकोपोडिअम - स्वभावाने अहंकारी असतात, उलट उत्तर देणे, आज्ञा न पाळणे, विरोधाला विरोध करणे, अपशब्द वापरणे असा स्वभाव.

3) इग्निशिया - अबोल, घुम्या स्वभावाच्या, व्यक्ती वागण्यात सतत विरोधी प्रवृत्ती दिसतात. रागावलेलं मनाला लावून घेतात. नको म्हटलेल्या गोष्टी मुद्दाम करतात.

याशिवाय हिपाल सल्फ, लॅकेसिस, कॉस्टिकम, मर्क्‍युरी अशी अनेक औषधे लक्षण साधर्म्यावरून देता येतात.

बुद्धीने चांगल्या असलेल्या, हुशार समजल्या जाणाऱ्या मुलांमध्ये अनेकदा बंडखोर प्रवृत्ती दिसून येते. ती त्या मुलांचे नुकसानच करीत असते. त्यामागची कारणे आणि त्यावरील उपचारांची माहिती.

मुलांमधील अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (Oppositional Defiant Disorder)

""डॉक्‍टर, खरं तर मी अमोलसाठी तुमच्याकडे आले आहे. अमोल माझा तेरा वर्षांचा मुलगा. अतिशय हुशार, पण बंडखोर प्रवृत्तीचा. प्रत्येक गोष्टीत वाद घालतो, विरोधाला विरोध करतो. एकही संवाद त्याच्याशी धड करता येत नाही. आमच्या साध्या बोलण्याचं रूपांतरही दरवेळी वादातच होतं. आताही तुमच्याकडे यायला स्पष्ट नकार दिला, म्हणाला, ""मला नाही, तुम्हा पालकांनाच ट्रिटमेंटची गरज आहे.''

काही वेळा मुलांमधली नकारात्मकता मानसिक समस्येचं रूप धारण करते. या समस्येला अपोझिशनल डिफायन्ट डिसॉर्डर (ODD) असं म्हणतात. अशी बंडखोर प्रवृत्तीची असणारी मुलं त्यांच्या वयाला अपेक्षेपेक्षा जास्त नकारात्मक, आक्रमक, विरोधी आणि आवेशपूर्ण वागतात. या मुलांमध्ये दिसणारी लक्षणं-

खूप वेळा हट्ट व अडमुठेपणाने वागणं.

सतत मोठ्यांशी वाद घालणं.

मुद्दाम अवज्ञा करणं, नियम मोडणं.

मुद्दाम इतरांना राग येईल, चिडचिड होईल वा भांडणाला सुरवात होईल या तऱ्हेने वागणं.

क्षुल्लक कारणांवरून खूप राग येणं, त्यावरून इतरांना उद्धटपणे बोलणं.

स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडणं.

सूड घेण्याची वृत्ती.

साधारण पाच ते पंधरा टक्के शाळेतल्या वयाच्या मुलांमध्ये ही समस्या आढळते. या समस्येची ठोस कारणं जरी माहिती नसली तरी मुलाचा मूळचा अडमुठा स्वभाव, पालकत्वाच्या सदोष पद्धती, घरचं वातावरण, अशा अनेक गोष्टी याकरता जबाबदार असतात असं अभ्यासक मानतात. कधी कधी या समस्येबरोबरच मुलांमध्ये, अतिचंचलता, अध्ययन अक्षमता, भावनिक अस्थिरता अशा इतर समस्याही आढळतात.

अशा मुलांना हाताळणं, त्यांच्यावर संस्कार करणं, हे पालकांसाठी मोठंच आव्हान असतं. कारण यांच्या सतत नकारात्मक वागण्याने घरात वारंवार वाद, भांडण होतात, यांच्या विरोधाने चिडून पालक खूप कडक शिस्त लावणं, शिक्षा करणं अशी उपाययोजना करतात; पण त्यामुळे समस्या कमी होण्यापेक्षा वाढण्याचीच शक्‍यता जास्त असते. अशा मुलांशी वागताना पालकांनी काही तत्त्व खास करून लक्षात ठेवावी.

या मुलाला सतत हुकूमशाही पद्धतीने "नाही', "नको' म्हणून दडपणं टाळावं.

त्यांना एक व्यक्ती म्हणून आदराने वागवावं.

धमक्‍या, शिक्षा, विशेषतः मारणं किंवा शारीरिक कुठल्याच मुलांसाठी योग्य नाहीत.

पालकत्वामध्ये सातत्य, एकवाक्‍यता आणि ठामपणा हवा. शिस्त लावताना, नियम घालताना मुलांना सामावून घ्या. त्यांना त्यांचा राग योग्य पद्धतीने व्यक्त करायला शिकवा.

अशा मुलांना आणि पालकांना जशी समुपदेशनाची खूप मदत होते, तशीच या मुलांना होमिओपॅथिक उपचारांचाही खूप फायदा होतो. अर्थातच तज्ञ व्यक्तिशिवाय यापैकी काही औषधे -

1) ऍनाकारडियम - मानसिक आंदोलने खूप विरोधी प्रकारची असतात. कधी खूप चांगली कधी खूप विचित्र वागतात. स्वभावात खूप क्रूरता, तिरस्कार दिसून येतो.

2) लायकोपोडिअम - स्वभावाने अहंकारी असतात, उलट उत्तर देणे, आज्ञा न पाळणे, विरोधाला विरोध करणे, अपशब्द वापरणे असा स्वभाव.

3) इग्निशिया - अबोल, घुम्या स्वभावाच्या, व्यक्ती वागण्यात सतत विरोधी प्रवृत्ती दिसतात. रागावलेलं मनाला लावून घेतात. नको म्हटलेल्या गोष्टी मुद्दाम करतात.

याशिवाय हिपाल सल्फ, लॅकेसिस, कॉस्टिकम, मर्क्‍युरी अशी अनेक औषधे लक्षण साधर्म्यावरून देता येतात.

सौज्यन्य :ई-सकाळ